श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून वैज्ञानिक प्रज्ञेश म्हात्रे यांना परदेशातील शिक्षणासाठी पाच लाख रुपयांची मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त
वैज्ञानिक प्रज्ञेश लक्ष्मण म्हात्रे यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी परदेशात संधी मिळाली असून त्यांच्या भरारीला श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाने पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करून बळ दिले आहे. प्रज्ञेश म्हात्रे हे युनायटेड स्टेट अर्थात अमेरिकेत एअरोस्पेस इंजिनिअरिंग प्रोग्राम या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणार आहेत.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे संस्थापक माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मदतीचा धनादेश प्रज्ञेश म्हात्रे यांना मंगळवारी (दि. 13) सुपूर्द केला. या वेळी प्रज्ञेश यांचे वडील लक्ष्मण म्हात्रे, अनिल पाटील, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे कार्यालयीन व्यवस्थापक अनिल कोळी उपस्थित होते.
सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य अशा विविध क्षेत्रात गेल्या 25पेक्षा जास्त वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणार्‍या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने उच्च शिक्षण घेणार्‍या आणि आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन स्वतःच्या पायावर उभे केले जाते. प्रज्ञेश म्हात्रे यूएसमधील एरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये एअरोस्पेस इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणार असून त्यांना या उच्च शिक्षणासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत केली तसेच पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या.

मी यूएसमध्ये माझे पुढील शिक्षण घेणार आहे. या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च असतो. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या संदर्भात मला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत केली. त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे.
-प्रज्ञेश म्हात्रे, वैज्ञानिक

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply