Breaking News

खोपोलीत अवकाळी पाऊस;नागरिकांची तारांबळ

खोपोली : प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून असणार्‍या ढगाळ वातावरणनंतर अखेर बुधवारी (दि. 14) खोपोलीत दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास अर्धा तास आलेल्या या अवकाळी पाऊसाने नागरिक, शेतकरी, व्यापार्‍यांची चांगलीच धावपळ उडाली.
मागील दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पाऊसाची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे बांधकामाशी संबंधित व्यवसाहिक, बिल्डर्स , अन्य व्यापार्‍यांनी काही प्रमाणात खबरदारी घेतली होती. बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास खोपोली व परिसरात  काही प्रमाणात वार्‍यासह अर्धा तास अवकाळी पाऊस कोसळला. या अवकाळी पाऊसामुळे खंडाळा घाटात वाहने घसरून दोन अपघातही घडले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.

Check Also

वडापाव दिवस २३ ऑगस्ट; सिनेमाच्या जगातही भारी टेस्टी!

वडापाव असं म्हणताक्षणीच तुम्हा प्रत्येकाच्या जीभेवर म्हणा, डोळ्यासमोर म्हणा, आठवणीत म्हणा त्याची चव आलीच असणार. …

Leave a Reply