अरुणशेठ भगत यांचे मार्गदर्शन
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधुम सुरू आहे. या निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांचे उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरु आहे. त्यापार्श्वभुमीवर भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या उपस्थितीत कानपोली येथे आढावा बैठक बुधवारी (दि. 14) झाली.
कानपोली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी भाजपच्यावतीने बाळकृष्ण आत्माराम पाटील हे सरपंच पदाचे उमेदवार आहेत तर प्रभाग क्रमांक 3मधून कल्पेश खानावकर, छबी चौधरी, प्रभाग क्रमांक 2मधून प्रदीप मते, गिता जोशी तसेच प्रभाग क्रमांक 1मधून बामा उघडा, नंदा पारधी, मंजुळा पाटील या उभ्या असून त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे.
दरम्यान बुधवारी झालेल्या आढवा बैठकीला भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, प्रकाश खैरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.