कानपूर ः वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेटपटू कुलदीप यादवने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे, पण कुलदीप हॉस्पिटलऐवजी आपल्या गेस्ट हाऊसच्या लॉनमध्ये लसीकरण करताना दिसून आला. त्यामुळे कोरोनासंबंधित प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे.
कुलदीपने लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर एक फोटो शेअर केला आणि ट्विट करून सर्वांनी ही लस घ्यावी अशी विनंती केली. लस घ्या. सुरक्षित राहा. कारण कोरोनाविरुद्ध लढ्यात एकत्र येण्याची गरज आहे, असेही त्याने सांगितले.
कुलदीपचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. लसीकरणाच्या वेळी कुलदीपला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यावरून कानपूर जिल्हाधिकारी आलोक तिवारी यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी अतुल कुमार यांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
26 वर्षीय कुलदीपसाठी मागील सहा महिने कठीण राहिले आहेत. आगामी इंग्लंड दौर्यासाठीही त्याची निवड झालेली नाही.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …