50 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर उरणकरांचे स्वप्न साकार
उरण ः वार्ताहर
मागील वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या उरणकरांच्या स्वप्नांचा मार्ग आता दृष्टीपथात येऊन ठेपला आहे. 27 किमी लांबीचा आणि सुमारे 1782 कोटी खर्चाच्या नेरुळ-उरण मार्गावरील दुसर्या टप्प्यातील खारकोपर ते उरण हा 14.3 किमी लांबीच्या रेल्वे मार्गावरील काम प्रगतीपथावर आहे. सर्वच अडथळे दूर झाल्यानंतर 1.2 किमी लांबीचा जासई उड्डाणपूलाच्या रखडलेल्या कामालाही जोरदार सुरुवात झाली आहे. नेरुळ-उरण मार्गावरील उरण हे शेवटचे स्टेशन आहे. या शेवटच्या उरण स्टेशनाचे कामही वेगात सुरू आहे. नेरुळ-उरण रेल्वे मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी मध्यरेल्वे प्रशासनाने फेबु्वारी 2023 पुन्हा एकदा डेडलाईन दिली आहे.त्यामुळे 50 वर्षांपासून उरणकरांनी रेल्वे सुरू होण्याचे पाहिलेले स्वप्न 2023मध्ये सत्यात उतरणार आहे.यामुळे उरणकरांसाठी विकासाचे आणखी एक दालन खुले होणार आहे.