पनवेल ः प्रतिनिधी/वार्ताहर
पनवेल बार असोसिएशन कार्यकारिणीच्या निवडणुकीत अॅड. मनोज भुजबळ यांच्या पॅनेलचे अॅड. सुशांत घरत हे बिनविरोध विजयी झाले आहेत. पनवेल बार असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक 21 डिसेंबर रोजी होत असून यामध्ये असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. मनोज भुजबळ पुन्हा अध्यक्षपदासाठी रिंगणात उभे असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. अॅड. मनोज भुजबळ यांच्या पॅनेलने या निवडणुकीत 11 उमेदवार उभे केले. अॅड. मनोज भुजबळ प्रत्येक मतदारांच्या भेटीगाठी घेऊन पुन्हा एकदा निवडून देण्याचे आवाहन करीत आहेत. यंदाच्या निवडणुकीत सचिव पदासाठी अॅड. प्रल्हाद खोपकर हे चौथ्यांदा उभे राहिले आहेत, तर उपाध्यक्षपदासाठी अॅड. संदीप जगे, सहसचिव पदासाठी अॅड. सिमा भोईर, खजिनदार पदासाठी अॅड. धनराज तोकडे, ऑडिटर पदासाठी अॅड. विशाल डोंगरे तर सदस्य पदासाठी अॅड. प्रगती माळी, दीपाली बोहरा, अमित पाटील, भूषण म्हात्रे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. 21 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 5 दरम्यान नवीन कोर्ट इमारत येथे मतदान होणार आहे. आम्ही निवडून आल्यास वकिल वर्गाच्या न्यायालयीन कामाकाजाच्या व इतर समस्या तातडीने सोडवणार असून नवोदित वकिलांकरीता शैक्षणिक व कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवणार आहोत. त्यामुळे मतदारांनी पुन्हा एकदा आम्हाला निवडून द्यावे, असे आवाहन अॅड. मनोज भुजबळ यांनी केले.