अलिबाग : प्रतिनिधी – प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत रायगड जिल्ह्यात गावोगावी शेतकर्यांना पीक विमा माहिती देण्यासाठी मोबाइल व्हॅन फिरणार आहे. त्याचा शुभारंभ भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आला. भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड महेश मोहिते आणि अलिबाग ओबीसी सेल अध्यक्ष अशोक वारगे यांच्या हस्ते शुभारंभ झाला.
भाजप अलिबाग शहर चिटणीस निखिल चव्हाण, जिल्हा युवा सदस्य संदीप पवार, युवा नेते पलाश प्रभू, कॉमन सर्विस सेंटरचे जिल्हा मॅनेजर राजेश पाटील, एचडीएफसी एरगो रायगड जिल्हा मॅनेजर राजेश गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते.