

पनवेल ः रामप्रहर वृत्त
सकाळ वृत्तपत्र समूह आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून ‘नाते तुमचे आमचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांसाठी खेळ पैठणीचा, दिल खुलास गप्पा गोष्टी आणि अनेक कलाकारांच्या गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (दि. 10) करण्यात आले होते. याचे उद्घाटन पनवेल महापलिकेच्या महापौर डॉ. कविता चैतमोल यांच्या हस्ते आणि सुप्रसिद्ध अभिनेते मंगेश देसाई यांच्या प्रमुख उपस्थित झाले. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट दिली. कळंबोली येथील सेंट सबॅस्टिअन चर्चमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांसाठी खेळ पैठणीचा, दिलखुलास गप्पा गोष्टी तसेच अनेक सुप्रसिद्ध गायकांनी गीते या वेळी सादर केली. या कार्यक्रमाला महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, नगरसेविका दर्शना भोईर, विद्या गायकवाड, प्रमिला पाटील, महिला मोर्चाच्या कळंबोली शहर अध्यक्ष प्रियंका पवार, श्वेता खैरे यांच्यासह पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या वेळी लालबत्ती चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश मोहते आणि अभिनेते मंगेश देसाई यांनी रसिकांसोबत संवाद साधला तसेच हास्य अभिनेते योगेश सुपेकर यांनी निवेदक म्हणून काम पाहिले. तसेच या कार्यक्रमाला अभिनेत्री अलंक्रित राठोड यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अभिनेते मंगेश देसाई आणि अभिनेत्री अलंक्रित राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.