Breaking News

भाजप नेते अ‍ॅड. चेतन पाटील यांच्याकडून मुरूडमधील मासळी शेडची पाहणी

मुरूड : प्रतिनिधी

भाजप आमदार रमेश पाटील यांनी दिलेल्या आमदार निधीतून मुरूड मासळी मार्केटच्या पाठिमागील शेड नव्याने बांधण्यात येत आहे. हे काम तत्परतेने मार्गी लागण्यासाठी भाजप मच्छीमार सेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अ‍ॅड. चेतन पाटील यांनी शुक्रवारी (दि. 23) या ठिकाणी भेट देऊन कामाची पहाणी केली. व ठेकेदाराला लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. चक्रीवादळात मुरूडमधील मासळी लिलावाची शेड जमिनदोस्त झाली होती. त्यामुळे स्थानिक मच्छिमारांना समुद्रातून मिळाली मासळी लिलाव करण्यासाठी आसरा राहिला नव्हता. नवीन शेड उभारण्यासाठी निधी मिळावा, अशी  मागणी येथील मच्छिमार संघांनी आमदार रमेश पाटील यांच्याकडे  केली होती. त्यानुसार आमदार पाटील यांनी 16 लाखाचा निधी दिला आहे. या निधीतून मुरूड मासळी मार्केटच्या पाठिमागे नव्याने शेड उभारण्यात येत आहे. मात्र हे काम मंदगतीने सुरु होते. अ‍ॅड. चेतन पाटील यांनी शुक्रवारी या कामाची पाहणी केली. व जानेवारी महिन्याचा अखेरपर्यंत हे काम पूर्ण करावे, अशी सूचना ठेकेदाराला केली. या वेळी सागर कन्या मच्छिमार संघाचे चेअरमन मनोहर बैले, प्रकाश सरपाटील, महेंद्र गार्डी, राजन चुनेकर, ताराचंद कोंडे, दीपक गोसावी, गोगर गुरुजी यांच्यासह मच्छीमार उपस्थित होते.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply