खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
मुंबई-पुणे महामार्गावर रिकाम्या पेट्रोल टँकरला वेल्डिंग करीत असताना स्फोट होऊन दोन जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि. 27) दुपारी 1.30च्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई-पुणे महामार्गावर हाळ गावच्या हद्दीत सागर हॉटेलसमोरील गॅरेजमध्ये एका रिकाम्या पेट्रोल टँकरचे (एमएच 49 बीएफ 7570) वेल्डिंग काम सुरू होते. या वेळी अचानक टँकरचे झाकण उडून दोन जण गंभीर जखमी झाले. यापैकी एकाच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापती झाल्या, तर दुसर्याचे पाय भाजून सोलून निघाले. जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालक जुबेर शहा (उत्तर प्रदेश) व गॅरेज कर्मचारी मुन्नाभाई अशी त्यांची नावे आहेत. या घटनेबाबत खालापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …