नवी मुंबईमध्ये पहिल्या फेरीत 10,568 बालकांना डोस
नवी मुंबई : बातमीदार
नमुंमपा टास्क फोर्सच्या 30 नोव्हेंबर व 13 डिसेंबरच्या विशेष बैठकीत महापालिका आयुक्तांनी मान्यता दिल्यानुसार शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने नवीन उद्रेक सुरू झाल्यास नऊ महिने ते ते पाच वर्ष वयाच्या बालकांना गोवर रुबेलो लसीचा एक अतिरिक्त डोस तसेच सहा महिने ते नऊ महिने वयाच्या बालकांस एमआर लसीचा झिरो डोस देण्याचे निश्चित करून त्याच्या अंमलबजावणीस सुरूवात करण्यात आली होती.
यानुसार 1 ते 14 डिसेंबर पर्यंतच्या अतिरिक्त लसीकरण सत्र मोहीमेत उद्रेक कार्यक्षेत्रामध्ये 6 ते 9 महिने वयोगटातील 245 बालकांना झिरो डोस तसेच 9 महिने ते 5 वर्ष वयोगटातील 10,568 बालकांना अतिरिक्त डोस देण्यात आलेले आहेत.याचप्रमाणे शासनाच्या सूचनांप्रमाणे विशेष गोवर रूबेला लसीकरण मोहिमेची पहिली फेरी 15 ते 25 डिसेंबर या कालावधीत अत्यंत सुयोग्य नियोजन केल्याने नमुंमपा क्षेत्रात यशस्वीपणे पार पडली. या विशेष मोहिमेअंतर्गत पहिल्या फेरीत 232 लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले व एकूण 1246 बालकांच्या लसीकणाचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला. या 232 लसीकरण सत्रांमध्ये 25 डिसेंबरपर्यंत 659 लाभार्थी बालकांना म्हणजेच उद्दिष्टापेक्षा जास्त 105 टक्के बालकांना एमआर लसीचा पहिला डोस देण्यात आला. तसेच उद्दिष्टापेक्षा अधिक 677 बालकांना म्हणजेच 110 टक्के बालकांना एमआर लसीचा दुसरा डोस देण्यात आला.
शासन निर्देशानुसार 15 ते 25 जानेवारी 2023 या कालावधीत विशेष गोवर रूबेला लसीकरण मोहिमेची दुसरी फेरी आयोजित करण्यात येत असून त्याचेही सुयोग्य नियोजन करण्यात येत आहे. याविषयी महापालिका आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) अभिजित बांगर यांनीही नुकताच आढावा घेतला असून उद्रेक क्षेत्रातील अतिरिक्त डोस व झिरो डोस देण्याच्या कार्यवाहीकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देशित केलेले आहे.
Check Also
पेणमध्ये आज आमदार रविशेठ पाटील यांचे शक्तीप्रदर्शन
पेण ः प्रतिनिधी विधानसभेची लगबग सर्वत्र सुरू आहे. पेण मतदारसंघातून भाजपचे माजी मंत्री आमदार रविशेठ …