Breaking News

आदिवासी कुटुंबांना घरपोच धान्यवाटप; पोलीस-व्यापारी मित्रांचा स्तुत्य उपक्रम

अलिबाग ः जिमाका  – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे कर्जतमधील आदिम जमात असणार्‍या कातकरी कुटुंबाची होणारी उपासमार टाळण्यासाठी कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर व कर्जतचे व्यापारी अमित पारस ओसवाल, मनोज पारस ओसवाल, जयंतीलाल शेषमाल परमार यांच्या वतीने आदिवासींना त्यांच्या घरी जाऊन धान्याचे वाटप करण्यात आले.

तालुक्यातील जांभूळवाडी, वडाचीवाडी व वंजारवाडी येथील 150 कुटुंबांना प्रत्येकी 10 किलो तांदूळ, दोन किलो साखर, चहा, मीठ, मसाला पावडर, दोन किलो तेल, हळद आदींचे किट देण्यात आले.

ही मदत वाटताना शासनाने घालून दिलेले सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. दोन व्यक्तींमध्ये किमान मीटरभर अंतर पाळत, तोंडावर मास्क किंवा रूमाल लावून एका घरातील एकाच व्यक्तीला बाहेर बोलावून शिस्तबध्दपणे मदतीचे वाटप करण्यात आले.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply