Breaking News

आजाराला कंटाळून वृद्ध व्यक्तीची आत्महत्या

महाड : प्रतिनिधी

महाड तालुक्यातील जिते गावात एका 85 वर्षांच्या व्यक्तीने एकटेपणा आणि आजाराला कंटाळून राहत्या घराच्या छताला नायलॉनच्या रस्सीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही घटना 27 डिसेंबर रोजी दुपारी 11:30 ते 30 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. गोविंदराव गेनू ननावरे (वय 85, रा. जिते, महाड) यांनी आपल्या राहत्या घरी छताच्या भाळाला नायलॉनच्या रस्सीने गळ फास घेऊन आत्महत्या केली. मयत व्यक्तीला तीन मुली आणि एक मुलगा होता. 20 वर्षा पूर्वी पत्नीचे निधन झाले असून 15 वर्षांपूर्वी मुलगा मयत झाला होता. सून माहेरी राहत होती तर तीनही मुलींचे लग्न झाल्याने त्या सासरी राहत होत्या.

गोविंद ननावरे हे घरामध्ये एकटेच राहत असल्याने वृद्धपणाला आणि आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली. महाड अद्योगिक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार राजेश गोरेगावकर करत आहेत.

Check Also

महापालिका कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्य -माजी सभागृह नेते परेश ठाकूर

म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेळावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मेळावा म्युन्सिपल एम्प्लॉईज …

Leave a Reply