Breaking News

2 जानेवारीला होणार म्हसळ्यातील 13 ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांची निवड

म्हसळा : प्रतिनिधी

म्हसळा तालुक्यात 13 ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाची निवडणुक 2 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत होणार आहे.

सार्वत्रिक निवडणुका 18 डिसेंबर 2022 ला झाली असून मा. जिल्हाधिकारी रायगड यानी मंगळवार 27 डिसेंबर 2022 रोजी आधिसूचनेनुसार  पुढीलप्रमाणे सरपंच जाहीर केले आहेत. काळसुरी- राजेंद्र चंद्रकांत घोसाळकर, फळसप – साळवी सुधीर परशुराम, कणघर -सावंत रश्मी संतोष, तोराडी – पवार गुलाब अरविंद, संदेरी -पास्टे शुभांगी विलास, घोणसे -रमेश धोंडू कानसे, लेप-शिगवण स्नेहा संजय, तोंडसुरे -सुरेश भिकू महाडीक, खरसई- कोमल कमळाकर वेटकोळ, देवघर -पोटले सौजन्या सुजित, निगडी- पाखड वेदिकाकल्पेश, कांदळवाडा-बने पांडुरंग महादु, रेवली सरपंच राखीव प्रवर्गातील उमेदवार असल्याने सरपंचपद रिक्त आसल्याने मंडळ आधिकारी सलीम शहा यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचाची निवड होणार आहे.

उपसरपंचपदाची निवडणुक मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच निवडणुक नियम1964 मधील नियम व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधिल कलम 33 मधील तरतुदीनुसार 2 जानेवारी 2023 रोजी स.10ते 2 वाजेपर्यंत होणार आहे.) निवडणुक प्रक्रिया सरपंचाचे अध्यक्षते खाली होणार आहे.

निवडणुक कार्यक्रम पुढील प्रमाणे असेल. नामनिर्देशनपत्र भरण्याची वेळ सकाळी 10 ते 12 व नामनिर्देशनपत्र छाननी दुपारी 1 .30 ते 1.45 वाजेपर्यंत होईल. नामनिर्देशनपत्र माघार कालावधी दुपारी 1.45 ते 2.4 प्रत्यक्ष निवडणूक दुपारी 2 ते कामकाज संपेपर्यंत आहे.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply