Breaking News

खंडाळा घाटात टेम्पो उलटून एकाचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी

खंडाळा घाट क्षेत्रात अपघातांची मालिका सुरूच आहे. शनिवारी पहाटे साडे दहा वाजण्याच्या सुमारास माल वाहतुक करणारा आयशर टेम्पो उलटून भीषण अपघात घडला. यात टेम्पो मधील एकाचा मृत्यू व दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. दोघे जखमींना सुरुवातीला खोपोली पालिका रुग्णालयात व नंतर एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

जुन्या मुंबई-पुणे हायवे खंडाळा घाटात शिंग्रोबा मंदिराच्या अलीकडे असलेल्या वळणावर विरुद्ध दिशेने आलेला आयशर टेम्पो अनियंत्रित होऊन उलटल्याने त्यातील सिमेंटचे पोल व अन्य साहित्य रस्त्यावर पडली. या अपघातात टेम्पोमधील तिघे जण गंभीर जखमी झाले. आपत्कालीन यंत्रणेने त्यांना खोपोली नगरपालिका रुग्णालयात आणले. या दरम्यान विशाल राजेंद्र गाडे (वय 25, रा. भोसरी, पुणे) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर चालक आकाश बळीराम खळगे (वय 28, रा. भोसरी, पुणे) दुसरी जखमी व्यक्ती इसाक मुसा शेख (वय 28, रा. भोसरी, पुणे) यांना खोपोलीतील पालिका रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी या दोघांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दोघांनाही गंभीर स्वरूपाच्या इजा आहेत.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply