Breaking News

उरण रेल्वेमार्गाच्या कामाला वेग

नव्या वर्षात होणार वाहतुकीसाठी सुरू

उरण : रामप्रहर वृत्त
नेरूळ ते उरण रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गावरील बोकडविरा स्थानक आणि द्रोणागिरी नोडला जोडणार्‍या रेल्वे उड्डाण पुलाचे काम पूर्ण होत आले आहे. हा पूल लवकरच वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे उरण पनवेल मार्ग ते द्रोणागिरी नोडमधील अंतर कमी होणार आहे. उरण ते नेरूळ मार्गावरील खारकोपरपर्यंत रेल्वेमार्ग सुरू झाला आहे, मात्र यातील गव्हाण ते उरण हा 14 किलोमीटरचा मार्ग अपूर्ण आहे. या मार्गाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी दिल्लीतून प्रधानमंत्री कार्यालयातून पाठपुरावा केला जात आहे. त्यामुळे मार्गातील अडथळे दूर करण्यात आले आहेत. परिणामी उर्वरित रेल्वे मार्गाच्या कामाला वेग आला आहे. यामध्ये रेल्वे रूळ तसेच स्थानकांची कामे ही सुरू आहेत. यातील बोकडविरा वायू विद्युत केंद्र कामगार वसाहत ते वायू विद्युत केंद्र येथील रेल्वे मार्गावर सिडको कडून उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे. या उड्डाणपूलाचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

राज्यातील सत्तांतरानंतर अनेक प्रकल्प मार्गी
राज्यात झालेल्या सत्तांतरामुळे विविध विकासकामे मार्गी लागत आहेत. रखडलेल्या प्रकल्पांच्या कामांना वेग आला आहे. सरकारच्या अखत्यारित येणारे सर्वच विभाग कार्यरत झाले आहेत. त्याचअनुषंगाने उरण रेल्वे प्रकल्पही लवकरच पूर्ण होणार असल्याने नागरिक राज्यातील सरकारबद्दल समाधान व्यक्त करीत आहेत.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply