Breaking News

देशाला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर नेणारा अर्थसंकल्प -सुधीर मुनगंटीवार

मुंबई : प्रतिनिधी

शेतकरी, महिला आणि गाव-शहरांचा सर्वांगीण विकास याला केंद्रबिंदू ठेवून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात देशाला सर्वच क्षेत्रात आघाडीवर नेण्याचा प्रयत्न केला आहे, अशी प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. देश महात्मा गांधीजी यांची 150वी जयंती साजरी करत असताना त्यांना अभिप्रेत असलेला सक्षम गाव-सक्षम देश घडवण्याला या अर्थसंकल्पातून खर्‍या अर्थाने बळ मिळाले आहे. देशाची अर्थव्यवस्था जी 2013-14मध्ये 11व्या स्थानावर होती ती केवळ पाच वर्षांत सहाव्या स्थानावर पोहोचली आहे. हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारचे ठळक यश आहे. आर्थिक प्रगतीचा हा वेग पाहता येत्या काळात पाच ट्रिलियन डॉलरचे लक्ष्य निश्चितपणे पूर्ण होईल यात मुळीच दुमत नाही. 2022पर्यंत शेतकर्‍यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ करण्याचा संकल्प असो की 2022पर्यंत प्रत्येक घरात वीज आणि एलपीजी गॅस पोहचविण्याचा संकल्प असो या माध्यमातून सरकारची गरिबांच्या व शेतकर्‍यांच्या कल्याणाविषयीची सजगता स्पष्ट होते. भारताला रोजगार प्रधान देश म्हणून मान्यता मिळवून देताना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षिक करण्याचा संकल्प हा  देशातील युवकांचे मनोबल उंचवणारा आहे. युवकांसाठी नॅशनल रिसर्च फाऊंडेशनची स्थापना हे युवाशक्तीच्या सशक्तीकरणाच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. नवीन उद्योग कॉरीडोरच्या माध्यमातून उद्योग क्षेत्राला सरकारने प्रोत्साहन दिले आहे. रोजगार, उद्योग व पायाभूत सुविधांसाठी करण्यात आलेली लक्षणीय तरतूद देशाच्या प्रगतीचा आलेख वाढत असल्याचे द्योतक आहे. अन्नदात्याला ऊर्जादाता करण्यासाठी विविध योजना राबवून त्याचे सशक्तीकरण करण्याचा सरकारचा मनोदय शेतकरी आणि गरीबों के सन्मान में, मोदी सरकार मैदान में हे स्पष्ट करणारा आहे, असेही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. या अर्थसंकल्पाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे अभिनंदन करतो, असेही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply