Breaking News

छत्रपती संभाजीराजेंबद्दल अवमानजनक विधान

खोपोली भाजपतर्फे विरोधी पक्षनेते अजित पवारांचा निषेध

खोपोली : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते असे अवमानजनक विधान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. याच्या निषेधार्थ सोमवारी (दि. 2) खोपोली भारतीय जनता पक्ष, महिला मोर्चाच्या वतीने दीपक चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या.
महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात भाजपचे खोपोली शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, सरचिटणीस सुनील नांदे, प्रमोद पिंगळे, चिटणीस गोपाळ बावस्कर, महिला मोर्चा शहर अध्यक्ष शोभा काटे, सरचिटणीस अश्विनी अत्रे, अपर्णा साठे, कामगार आघाडी संयोजक सूर्यकांत देशमुख, युवा मोर्चा शहराध्यक्ष अजय इंगुलकर, महिला मोर्चा जिल्हा कोषाध्यक्ष रसिका शेटे, सदस्य स्नेहल सावंत, माजी नगरसेविका अपर्णा मोरे, सुमिता महर्षी, रक्षा मालोदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply