Breaking News

हमरापूर प्रीमियर लीगचा थरार

भाजप नेते वैकुंठ पाटील यांच्या हस्ते उदघाटन

पेण : प्रतिनिधी
पेण तालुक्यातील हमरापूर येथे प्रीमियम लीग आयोजित करण्यात आली असून या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून फटकेबाजी केली.
दुर्गादेवी मैदानावर खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास भाजप जिल्हा सचिव मिलिंद पाटील, मनसे तालुकाध्यक्ष रूपेश पाटील, लीग अध्यक्ष प्रवीण पाटील, उपाध्यक्ष सूर्यास पाटील, खरोशी  सरपंच, उपसरपंच यांच्यासह क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने हजर होते.
हमरापूर प्रीमियर लीग 4 ते 8 जानेवारीदरम्यान रंगणार असून मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. विजेत्या संघास एक लाख रुपये  व आकर्षक ट्रॉफी, उपविजेत्या संघास 50 हजार रुपये व आकर्षक ट्रॉफी, तृतीय संघास 25 हजार रुपये व आकर्षक ट्रॉफी, चौथा क्रमांक पटकावणार्‍या संघास 15 हजार रुपये व अन्य आकर्षक बक्षिसांची लयलूट होणार असल्याने स्पर्धेत अनेक संघ सहभागी झाले आहेत.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply