Breaking News

रोह्यात पं.स. शिक्षण विभागात 93 पदे रिक्त

पाच वर्षे गट शिक्षणाधिकारीविनाच तालुक्यात कारभार

 

रोहे : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. चांगले विद्यार्थी घडावेत, हा या मागचा उद्देश आहे, परंतु रोहा तालुक्यात गेले पाच वर्ष गटशिक्षणाधिकारी पदच भरले गेले नाही. गेले पाच वर्ष शिक्षण विस्तार अधिकारी हा विभाग सांभाळत आहेत. रोहा पंचायत समिती शिक्षण विभागात अधिकारीकारार्‍यांसह शिक्षक असे एकूण 93 जागा रिक्त आहे. त्यामुळे कमी अधिकारी, शिक्षक सध्या शिक्षण विभागाचा कारभार चालवत आहेत. शिक्षणसारख्या पवित्र असलेल्या विभागात रिक्त पदे भरली जात नाहीत ही मोठी शोकांतिका आहे. शिक्षकांची निवृत्ती, मृत्यू यासह अन्य कारणांनी तालुक्यात शिक्षण विभागात जागा रिक्त आहेत. यापुढे 2022-23 या नवीन शैक्षणिक वर्षाची अवघ्या दोन महिन्यात सुरूवात होणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षासाठी रिक्तपदे भरण्याची आवश्यकता आहे. या महत्त्वाच्या विषयाकडे संबधितांनी लक्ष देवून रिक्त पदे भरल्यास नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शिक्षक मिळतील. रोहा पंचायत समिती शिक्षण विभागात 93 जागा रिक्त असल्याने ज्ञानार्जन सारख्या विभागात पदे भरली जात नसल्याने मुलांच्या शिक्षणावर परीणाम होण्याची शक्यता आहे. रोहा पंचायत समिती शिक्षण विभागात  या विभागाचे प्रमुख पद असलेले गट शिक्षणाधिकारी हे पद गेल्या पाच वर्षांत  भरले नसल्याचे दिसून येत आहे.  शिक्षण विस्तार अधिकारी सध्या हा कारभार पहात आहेत. शिक्षण विभागात कनिष्ठ विस्तार अधिकारी 3 जागा मंजूर असून यातील एक कार्यरत आहेत. यापैकी 2 जागा रिक्त आहेत. तालुक्यात 18 केंद्र प्रमुखांपैकी 6 केंद्र प्रमुख कार्यरत असून 12 केंद्र प्रमुख पदे अद्याप रिक्त आहेत. शिक्षणाचा मुख्य गाभा असलेल्या ज्ञानार्जन करणारे शिक्षकांची तालुक्यात कमतरता आहे.  तालुक्यात पदोन्नती मुख्याध्यापक पाच पदे असून 1 पदोन्नती मुख्याध्यापक कार्यरत असून त्यातील 4 पदे रिक्त आहेत. तालुक्यात पदवीधर शिक्षकांच्या 77 जागा मंजूर असून त्यातील दोन उर्दू व 75 मराठी शाळांसाठी आहेत. यामध्ये मराठीसाठी 65 पदवीधर शिक्षक तर उर्दूसाठी एक पदवीधर शिक्षक कार्यरत आहेत. असे एकूण 66 पदवीधर शिक्षक कार्यरत आहेत. पदवीधर शिक्षकांमध्ये 10 मराठी माध्यम व एक उर्दू माध्यमाची असे एकूण 11 जागा रिक्त आहेत. तालुक्यात उपशिक्षक मराठी माध्यमाची 465 व उर्दू माध्यमाची 18 जागा असे एकूण 483 मंजूर आहेत. यात सध्या मराठी माध्यमासाठी 390 उपशिक्षक तर उर्दू माध्यमाची 15 असे एकूण 405 उपशिक्षक कार्यरत आहेत. सध्या मराठी माध्यमाची 75 उपशिक्षक तर उर्दू माध्यमाची तीन जागा रिक्त असून एकूण 78 उपशिक्षकांची जागा भरण्याची आवश्यकता आहे.

पालक, शिक्षणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी

रोहा पंचायत समिती शिक्षण विभागात 93 जागा रिक्त असल्याने ज्ञानार्जन सारख्या विभागात पदे भरली जात नसल्याने पालक, शिक्षणप्रेमींमध्ये नाराजी आहे. रिक्तपदांमुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची दाट शक्यता नाकरता येत नाही. रोहा पंचायत समिती शिक्षण विभागात  या विभागाचे प्रमुखपद असलेले गट शिक्षणाधिकारी हे पद गेल्या पाच वर्षांत  भरले नसल्याचे पुढे येत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply