उरण : वार्ताहर
सध्या चांगलीच थंडी पडू लागली आहे. या गारेगार वातावरणात उरण तालुक्यातील चिरनेर परिसरात कडधान्य पिकांना बहर आला आहे. त्यामुळ येथील शेतकरीवर्ग आनंदी आहे.
यंदा परतीचा पाऊस लांबल्याने शेतकर्यांनी दीपावलीनंतर रब्बी हंगामातील कडधान्य लागवडीस सुरुवात केली. त्यामुळे थोडासा विलंब झाल्याने चालू हंगामात कडधान्य पिकांबाबत थोडीशी साशंकता होती, ही पिके चांगलीच बहरली असल्याचे चित्र चिरनेर परिसरात पहावयास मिळत आहे. अधूनमधून पडणारे दाट धुकेही पिकांच्या लागवडीस पोषक ठरत असल्याचे विभागातील शेतकरी कृष्णा म्हात्रे, प्रफुल्ल खारपाटील, हरिश्चंद्र गोंधळी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही चिरनेर येथील शेतकर्यांनी आपआपल्या शेतात वाल, चवळी, हरभरा, राई, मूग, मटकी, तूर, पावटा, घेवडा आदी कडधान्य पिके घेतली आहेत. यापैकी चवळी, मूग व मटकीची पिके तयार होऊ लागली आहेत. पुढील काही दिवसांनी सर्वच कडधान्य पिके तयार होतील. ढगाळ वातावरण व कीडरोगाचा प्रादुर्भाव झाला नाही तर अखेरच्या मोसमापर्यंत सर्वच पिकातून चांगले उत्पादन मिळेल, अशी आशा येथील शेतकर्यांना आहे.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …