Breaking News

विद्यार्थ्यांनी अनुभवली पोलीस ठाण्यातील कार्यपद्धती

पनवेल : वार्ताहर

पोलीस रेजिंग डे सप्ताहादरम्यान याकूब बेग हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात आल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी त्यांचे स्वागत केले व यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी पोलीस खात्यातील वेगवेगळ्या कामकाजा संदर्भात माहिती दिली.अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील शंका उपस्थित केल्या त्यांच्या शंकाचे निरासन विविध पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी केले. त्यांनतर अनेक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष हत्यारे व जेल पाहण्याची इच्छा व्यक्त केली असता विजय कदबाने यांनी त्यांनी इच्छा पूर्ण करत उपस्थित विद्यार्थ्यांच्या हातामध्ये हत्यारे दिली तर काहींनी जेलसह कैदी पहिले. या वेळी प्रत्यक्ष पोलीस ठाणे पाहून तेथील कामकाजाची रचना, कार्यपद्धती, हत्यारे व दारुगोळा याबाबतची माहिती उपस्थित अधिकारी वर्गाने दिली. शाळेतील सव्वाशे विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षक उपस्थित होते.  साधारण 8 वी ते 10 वी वर्गातील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश होता.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply