Breaking News

माणगावातील ‘त्या’ गृहसंकुलात 34 वर्षीय विवाहित तरुणाची आत्महत्या

माणगाव ः प्रतिनिधी
माणगाव शहरातील उतेखोलवाडी येथील महालक्ष्मी निवारा या गृहसंकुलामध्ये रक्ताचे ठिपके आढळून आल्याची घटना ताजी असतानाच सलग दुसर्‍या दिवशी या निवार्‍यामध्ये बिल्डिंग क्र. 2 मधील एका 34 वर्षीय विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. 5) घडली आहे. उतखोलवाडी येथील महालक्ष्मी निवारा गृहसंकुलातील बिल्डिंग क्र. 2मध्ये गुरुवारी दुपारी राजेंद्र सुभाष जाधव (वय 34) या विवाहित तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती समजताच माणगांव पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणले. या घटनेची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस करीत आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना राजस्थानी समाजाचा जाहीर पाठिंबा

खारघर : रामप्रहर वृत्त खारघर राजस्थानी समाजच्या वतीने दिपावली स्नेह मिलन आणि विशाल भजन संध्या …

Leave a Reply