Breaking News

गझल-मुशायर्‍याने जिंकली रसिकांची मने!

माणगाव ः प्रतिनिधी

 कोकण मराठी साहित्य परिषद साहित्याचा मधुघट समूहातर्फे रविवारी (दि. 31 मे) आयोजित केलेल्या ऑनलाइन गझल-मुशायरा कार्यक्रमाने रायगडकर रसिक व साहित्यिकांची मने जिंकली. कोकण मराठी साहित्य परिषदेचे सर्वेसर्वा पद्मश्री मधू मंगेश कर्णिक, अध्यक्ष अशोक ठाकूर, कार्याध्यक्षा नमिता किर, जनसंपर्कप्रमुख रायगड भूषण प्रा. एल. बी पाटील यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनातून हा कार्यक्रम पार पडला.

गझल मुशायर्‍याच्या या पहिल्याच ऑनलाइन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध गझलकार व 9व्या अखिल भारतीय गझल साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मधुसुदन नानिवडेकर यांनी आवर्जून उपस्थित राहून गझलविषयी उत्तम मार्गदर्शन करून स्वतःची बहारदार गझल सादर केली.कोमसाप दक्षिण रायगडचे अध्यक्ष संजय गुंजाळ यांनीही शुभेच्छापर मनोगत व्यक्त करून उत्साह दुणावला.

या गझल मुशायरा कार्यक्रमात सुधीर नागले-गोरेगाव, संध्या दिवकर-रोहा, सिद्धेश लखमदे-मुरूड, स्मिता गांधी-पनवेल, हनुमंत शिंदे-रोहा, ज्योती शिंदे-रोहा, गंगाधर साळवी-महाड, छाया गोवारी-पनवेल, अशोक कदम-गोरेगाव, डॉ. सुभाष कटकदौंड-खोपोली, रघुनाथ पवार-गोरेगाव व ज्योत्स्ना राजपूत-पनवेल यांनी लाजवाब गझला सादर करून रसिकांना आपल्या प्रतिभेने वेगळ्या विश्वात नेले. गझल-मुशायरा कार्यक्रमाचे ओघवते प्रभावी निवेदन ज्योत्स्ना राजपूत यांनी, तर प्रास्ताविक कवी अजित शेडगे व आभार प्रदर्शन कवी हेमंत बारटक्के यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक म्हणून डॉ. रघुनाथ पवार, अजित शेडगे व हेमंत बारटक्के यांनी परिश्रम घेतले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply