Breaking News

उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढणार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरातांनी दिले नाराजीचे संकेत

मुंबई ः प्रतिनिधी
महाराष्ट्रातीन जनतेची कोरोनासोबत निकराची लढाई सुरू आहे. राज्यात अशी गंभीर परिस्थिती असताना सत्तेतील महाविकास आघाडीत सर्वच काही आलबेल नाही हे आता स्पष्ट होत आहे. सत्तेत असतानाही आमचे काही प्रश्न आहेत आणि ते आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातले आहेत, अशी एक प्रकारची नाराजीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.  सत्तेत असतानाही आमचे काही प्रश्न आहेत, हे त्यांचे
वक्तव्य नाराजीचे स्पष्ट संकेत देणारे आहेत, असे म्हटले जात आहे.
सरकारमध्ये असूनही काँग्रेसला विचारात घेतले जात नाही. काँग्रेस नाराज आहे का, असा थेट प्रश्न थोरातांना पत्रकारांनी विचारला होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, साहजिकच आहे. आमचेही काही प्रश्न आहेत. अपेक्षा आहेत. त्यावर काम व्हावे असे आम्हाला वाटते. आमच्या जेव्हा एकत्र बैठका होतात त्यात आम्ही आमच्या भावना व्यक्त करतो, असे सांगत त्यांनी नाराजीचा सूर लगावला. सरकारमध्ये असतानाही ज्याअर्थी थोरात आमचेही काही प्रश्न आहेत असे म्हणतात त्यावरून काँग्रेसचे मत फारसे विचारात घेतले जात नाही असाच त्याचा अर्थ निघत असल्याचे मत राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण, राहुल गांधी आणि आता बाळासाहेब थोरात या तीन दिग्गज नेत्यांनी गेल्या काही दिवसांत ठाकरे सरकारविषयी नाराजीचा सूर लावल्याने सरकारवर संशयाचे ढग निर्माण झाले आहेत.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply