Breaking News

मॅरेथॉन प्री इव्हेंट सायकलिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद; हजारोंनी घेतला सहभाग

पनवेल : रामशेठ ठाकूर इंटरनॅशल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडेन्सी वेल्फेअर असोसिएशन यांच्या वतीने आणि सहआयोजक अदिम जाती मीना विकास असोसिएशनच्या सहकार्याने रविवारी (दि. 22) होणार्‍या खारघर मॅरेथॉन 2023च्या अनुषंगाने शनिवारी (दि. 21) खारघर येथे मॅरेथॉन प्री इव्हेंट म्हणून 15 किलोमीटर सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेत सायकलिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून  या स्पर्धेला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते तथा मॅरेथॉन प्रमुख परेश ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात झाली. या वेळी माजी नगरसेवक हरेश केणी, अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, निलेश बाविस्कर, अरुणकुमार भगत, शत्रुघ्न काकडे, रामजी बेरा, नरेश ठाकूर, गुरुनाथ गायकर, माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय, अनिता पाटील, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे रामदास शेवाळे, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे,  खारघर रेसिडेन्सी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अमर उपाध्याय, कीर्ती नवघरे, भाजप तळोजा मंडल युवा मोर्चा अध्यक्ष विनोद घरत, सुशील महाडिक, गीता चौधरी, मोना अडवाणी, मधुमिता जिना, चांदनी अवघडे, निलेश पाटील, शशांक त्रिपाठी, नरेंद्र त्रिपाठी, अक्षय पाटील, संजय घरत, डॉ. संतोष आगलावे उपस्थित होते. या प्री इव्हेंटला परिसरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply