Breaking News

पनवेल महापालिका हद्दीत रस्त्यांची कामे; सोसायट्यांच्या समोर डांबरीकरण

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक अजय बहिरा यांच्या पाठपुराव्यामुळे गोविंद सार्थ दर्शन सहकारी गृहनिर्माण सोसायटी आणि श्री साई श्रद्धा सोसायटीच्या समोरील रस्याचे डांबरीकरण आणि गटराच्या कामासाठी 18 लाख रुपये मंजूर झाले असून हे काम सुरू झाले आहे. भारतीय जनता पक्षातर्फे पनवेल तालुक्यासह शहरात विकासकामांचा झंझावात सुरू आहे. शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही ठिकाणी नागरिकांना उत्तर सोयीसुविधा देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मेहनत घेत असतात. त्यामुळे नागरिक वेळोवेळी आभार मानून या भाजपच्या या मेहनतीला कौतुकांची थाप देत असतात. पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 20 मधील गोविंद साई दर्शन सहकारी गृहनिर्माण सोसायटी आणि श्री साई श्रद्ध सोसायटीच्या समोरील रस्ता व गटारांची अवस्था दयनीय स्वरुपाची झाली असून, या रस्त्यावर छोटे मोठे खड्डे पडल्याने रस्त्यावरुन नागरीकांना ये-जा करताना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत होता. तसेच तसेच गटरांच्या दयनीय अवस्थेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असून नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्ना निर्माण झाला होता. याची दखल घेत माजी नगरसेवक अजय बहिरा यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिले होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून गोविंद साई दर्शन सहकारी गृहनिर्माण सोसायटी आणि श्री साईश्रद्धा सोसायटी समोरील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू झाले आहे. तसेच गटाराचे काम पुर्ण झाले आहे. या कामासाठी 18 लाख रुपयांचा निधी वापरण्यात येणार आहे.  दरम्यान, हे काम मार्गी लावल्याद्दल परिसरातील नागरिकांना माजी नगरसेवक अजय बहिरा यांचे आभार मानले आहेत तसेच या कामाबाबात रहिवासी बाबा नाईक यांनी अधिक माहिती दिली आहे. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि पनवेल महापालिकेचे नगरसेवक यांच्या सातत्यापुर्ण प्रयत्नांमुळे व केलेल्या पाठपुराव्यामुळे अनेक विकासाची कामे महापालिका क्षेत्रात होत आहेत.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply