Monday , January 30 2023
Breaking News

पंतप्रधान साधणार विद्यार्थ्यांशी संवाद

रायगडच्या विद्यार्थ्यांना लाईव्ह कार्यक्रम दाखविण्याचे नियोजन सुरू

अलिबाग : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परीक्षा पे चर्चा कार्यक्रमांतर्गत इयत्ता 9 वी ते 12वी दरम्यानच्या विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांशी शुक्रवारी (दि.  27)संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजित केला जाणार असून या कार्यक्रमाचे थेट ऑनलाईन प्रक्षेपण देशातील प्रत्येक शाळेत केले जाणार आहे. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना लाईव्ह पाहता यावा, रायगड जिल्ह्यातील शाळांना व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून संवाद कार्यक्रमा वेळी शिक्षण विभागातील प्रतिनिधी शाळांमध्ये उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व माध्यमिक विभाग शिक्षण अधिकारी ज्योत्स्ना शिंदे पवार यांनी दिली. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळात तणावमुक्त राहावे यासाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परीक्षा पे चर्चा’ याविषयावर थेट संवाद साधणार आहेत. या संवाद कार्यक्रम 9वी ते 12 वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पाहता यावा यासाठी जिल्हा परिषद प्रशासन व शिक्षण विभागाकडून योग्य नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सुमारे 1 लाख 40 हजार विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालक हा कार्यक्रम लाईव्ह पाहणार आहेत.तालुका स्तरावरील गट विकास अधिकारी या आ शाळांसोबत संपर्क साधून नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच संवाद कार्यक्रम वेळी शिक्षण विभागातील एक प्रतिनिधी शाळेत उपस्थित राहणार आहे. लोकप्रतिनिधी यांना संवाद कार्यक्रमास आमंत्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व माध्यमिक विभाग शिक्षण अधिकारी ज्योत्स्ना शिंदे पवार याबाबत आढावा घेत आहेत.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply