Breaking News

‘साई गणेश’च्या कर्मचार्‍यांनी स्वीकारले जय भारतीय कामगार संघटनेचे सदस्यत्व

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण

पनवेल ः रामप्रहर वृत्त
साई गणेश इंटरप्रायजेसच्या कर्मचार्‍यांनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. त्या अंतर्गत नवीन पनवेल येथे युनियनच्या नामफलकाच्या अनावरण भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष तथा संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 31) करण्यात आले.
जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या वतीने साई गणेश इंटरप्रायजेसच्या घंटागाडी  कर्मचार्‍यांनी युनियन केली आहे. या युनियनच्या नामफलक अनावरण सोहळ्यास महापौर डॉ. कविता चौतमोल, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती ब सभापती समीर ठाकूर, नगरसेविका राजेश्री वावेकर, संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, रवी नाईक, सचिव समीरा चव्हाण, जगदिश म्हात्रे, सरचिटणीस मोतीराम कोळी, चिटणीस विनायक मुंबईकर, राकेश भुजबळ आदी उपस्थित होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व कर्मचार्‍यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply