Breaking News

चिंध्रणमध्ये सरपंच, ग्रामस्थ चषक क्रिकेट स्पर्धा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रोशन साई स्पोर्ट्स चिंध्रणच्या वतीने ‘सरपंच व ग्रामस्थ चषक 2019’ आयोजित करण्यात आला आहे. या चषकांतर्गत प्रकाशझोतातील क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

या सरपंच व ग्रामस्थ चषकाचे उद्घाटन सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. चिंध्रण येथे रोशन साई स्पोर्ट्सच्या वतीने ‘सरपंच व ग्रामस्थ चषक 2019’अंतर्गत प्रकाशझोतातील क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. हे क्रिकेट सामने 23 मार्चपर्यंत सुरू राहणार आहेत. या क्रिकेट सामन्यांच्या उद्घाटनावेळी भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, चिंध्रणच्या सरपंच कमलाताई देशेकर, उपसरपंच तुषार दुर्गे, शिरवली विभागीय अध्यक्ष शिवाजी दुर्गे, भाजप महापालिका युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश खानावकर, माजी नगरसेविका वर्षा नाईक, महिला मोर्चाच्या तालुका सरचिटणीस लीना पाटील, प्रतिभा भोईर, कल्पना दुर्गे, बाबू मुंबईकर, भगवान कडू, गणपत कडू, अनंता कडू, नरेश सोनावणे यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply