Breaking News

उशीर झाल्यास धोनीने दिली ही शिक्षा

मुंबई : प्रतिनिधी

धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे खोवले गेले. कोणत्याही क्रिकेट मालिकेत किंवा सामन्यात संघ विजयी ठरल्यानंतर जेतेपदासाठी मिळणारं चषक स्वीकारत धोनी ते संघातील खेळाडूंच्या हाती देतो, प्रत्येक खेळाडूचं कौतुक करतो. धोनीची हीच शैली त्याला सर्वार्थाने एक यशस्वी आणि परिपूर्ण खेळाडू ठरवते. त्याच्या अशाच आणखी एका गुणाविषयी भारतीय क्रिकेट संघाच्या माजी मेंटल कंडिशनिंग कोच  असणारे पॅडी अपटोन यांनी खुलासा केला आहे.

संघातील प्रत्येक खेळाडूला वेळेचं महत्त्वं माहिती करून देण्यासाठी त्याने एक वेगळीच शक्कल लढवल्याचा उलगडा पॅडी अपटोन यांनी पुस्तकात केला. सामन्यासाठीच्या सरावासाठी उशिरा येणार्‍या खेळाडूकडून दंड आकारण्याची सुरुवात अनिल कुंबळेने केली होती, पण धोनीने याला थोडं वेगळंच वळण दिलं होतं. याविषयी माहिती देत ते लिहितात, ‘मी ज्या वेळी संघाशी जोडलो गेलो, तेव्हा अनिल कुंबळेकडे कसोटी संघाचं कर्णधारपद होतं, तर धोनी एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार होता. स्वतःचच परीक्षण करण्यासाठी म्हणून संघाला विचारण्यात आलं, सराव आणि मिटिंगसाठी सर्वांनी वेळेवर येण्याची गरज आहे का? यावर सर्वांनीच होकारार्थी उत्तर दिलं. उशिरा येणार्‍याने काय द्यावं? याच्याही चर्चा झाल्या. शेवटी हा निर्णय कर्णधारावरच सोपवण्यात आला.’ सरावासाठी उशिरा येणार्‍या खेळाडूने शिक्षा म्हणून 10 हजार रुपयांचा दंड द्यावा, असा निर्णय अनिल कुंबळेने घेतला, तर धोनीने या शिक्षेला वेगळ्याच प्रकारे सर्वांसमोर ठेवलं. ‘हो शिक्षा तर दिली पाहिजेच. त्यामुळे जर एकाही खेळाडूला उशीर झाला, तरीही संपूर्ण संघातील खेळाडूंनाही त्याच्या चुकीसाठी 10 हजारांचा दंड भरावा लागणार, अशी शिक्षा त्याने दिली. त्या दिवसापासून एकदिवसीय क्रिकेट संघात सरावासाठी कोणताही खेळाडू उशिरा आला नाही,’ हा महत्त्वाचा उलगडा त्यांनी केला. संघातील खेळाडूंना वठणीवर आणण्यासाठी धोनीने लढवलेली ही शक्कल पाहता, त्याचं कौतुक करावं तितकं कमीच.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply