आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभेच्छा
पनवेल ः रामप्रहर वृत्त
कळंबोली येथील मार्बल मार्केटमध्ये कजारिया गॅलेक्सी हे टाईल्स आणि सिरामिक्सचे शोरूम नव्याने सुरू झाले आहे. या दुकानाचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. त्यानिमित्त सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कजारिया गॅलेक्सी या शोरूमला भेट देऊन पुढील वाटचालीकरिता सदिच्छा व्यक्त केल्या. या वेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, कजारिया लिमिटेडचे जेएमडी रीशी कजारिया, प्रभाग समिती डचे अध्यक्ष तेजस कांडपिळे, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष अमर ठाकूर, अशोक मोटे यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.