नवी मुंबई : प्रतिनिधी
सिवूड प्रभाग 41 येथील सेक्टर 46 मध्ये साईकृपा सोसायटीसमोर असलेले धर्मवीर संभाजीराजे खेळाचे मैदान या ठिकाणी हायमास्ट बसविण्यात आला आहे. याकामी भाजपचे दत्ता घंगाळे यांनी नागरिकांच्या मागणीवरून नवी मुंबई मनपाकडे पाठपुरावा केला होता. धर्मवीर संभाजीराजे खेळाचे मैदान या ठिकाणी हायमास्ट बसविण्याची घंगाळे यांनी नागरिकांच्या मागणीवरून नवी मुंबई मनपाकडे विनंती केली होती. घंगाळे यांनी तत्काळ महापालिका शहर अभियंता, कार्यकारी अभियंता (विद्युत) यांच्याशी पत्रव्यवहार व सतत पाठपुरावा करून अखेर हायमास्ट नागरिकांच्या सेवेत रुजू झाला. या आधीसुद्धा मैदानात विद्युत दिवे बसविण्यात आले होते. हायमास्ट उद्घाटनाच्या वेळी महिला वॉर्ड अध्यक्ष अश्विनी दत्ता घंगाळे यासह अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी, समाजसेवक यांनी उपस्थित होते.