Breaking News

ग्रामीण भागातून चांगले शरीरशौष्ठवपटू घडू शकतात : सुनीत जाधव

अलिबाग : प्रतिनिधी

ग्रामीण भागातील तरुणांकडे जिद्द आहे. गुणवत्ता आहे. मेहनत करण्याची त्यांची तयारी आहे, परंतु त्यांना चांगल्या सुविधा नाहीत. योग्य मार्गदर्शन मिळत नाही. चांगल्या सुविधा व योग्य मार्गदर्शन मिळाले, तर ग्रामीण भागातून देखील चांगले शरीरशौष्ठवपटू घडू शकतात, असे मत तीन वेळा भारत श्री किताब पटकवणारा शरीरसौष्ठवपटू सुनीत जाधव याने व्यक्त केले.

अलिबाग येथे सुरू करण्यात आलेल्या डिवाईन एनर्जी जिमला सुनीत जाधव यांने भेट दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. डिवाईन एनर्जी जिमचे मालक सचिन पाटील या वेळी उपस्थित होते. मुबईसारख्या शहरात चांगल्या सुविधा आहेत. मुबईतील खेळाडूंना सर्व सुविधा उपलब्ध असतात. त्यामुळे तेथील खेळाडू स्पर्धांमध्ये चमकतात. ग्रमीण भगातील खेळाडूंना या सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे ते मागे पडतात. ग्रामीण भागतील तरुणांमध्ये तंदुरुस्तीची जागृती करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे. डिवाईन एनर्जी जिमचे सहकार्य घेऊन अलिबाग व आसपासच्या परिसारातील तरुणांमध्ये तंदुरुस्तीबद्दल जागृती व्हावी म्हणून काही सेमिनार घेऊन शरीरसौष्ठवासंदर्भातील माहिती त्यांना देणार आहे, असे सुनीत म्हणाला.

आपल्याला नेमके काय करायचे आहे हे शरीसौष्ठवपटूंनी ठरवले पाहिजे. केवळ भरपूर व्यायाम करून चालत नाही, तर आहारदेखील महत्त्वाचा असतो. विश्रांती आवश्यक असते. मनसिक स्वास्थ्य राखावे लागते. यासाठी नियोजन करावे लागते. आपले शरीर पिळदार दिसावे म्हणून शरीरसौष्ठवपटू सप्लीमेंंट खातात. त्यात काही गैर नाही, परंतु आपल्या शरीराला जेवढे आवश्यक आहे तेवढेच सप्लीमेंट घ्यायला हवे. आवश्यक तेवढाच आहार घेणे आवश्यक आहे. सप्लीमेंट जास्त प्रमाणात घेतले गेल्यास त्याचे विपरित परिणात शरीरावर होतात. त्यासाठीच शरीरसौष्ठवपटूंनी चांगाला मार्गदर्शक निवडायला हवा. कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला यश मिळवायचे असेल, तर घरच्यांचा पाठिंबा आवश्यक असतो. मला घरच्यांची साथ मिळाली. सुरुवातीला आई व भावाने प्रोत्सहन दिले. विवाह झाल्यानंतर पत्नीने साथ दिली. माझ्या आहाराची काळजी पत्नी घेते. त्यामुळेच मी हे यश संपादन करू शकलो. मुबई महापौर श्री, मुबई श्री, फेडरेशन श्री, महाराष्ट्र श्री हे  किताब मी मिळवले. तीन वेळा भारत श्री हा किताब पटकावला. अशियाई स्पर्धा जिंकली. आता मला जागतिक स्पर्धा जिंकायची आहे. त्याची तयारी सध्या मी करत आहे, असे सुनीत जाधव याने सांगितले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply