पेण : प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या कोंबडपाडा प्रीमिअर लीग 2019 स्पर्धेत विराज 11 संघ विजयी झाला. कोंबडपाडा प्रीमिअर लीग 2019 ही स्पर्धा 11 व 12 मे रोजी आंबेडकर शाळा क्र. 4 येथे घेण्यात आली.
या स्पर्धेमध्ये 4 संघ सहभागी झाले होते. विराज 11 संघाचे अरविंद आंबोलकर, ग्लोरियस संघाचे प्रकाश शिंगरूत आणि उल्हास शिंगरूत, मनोज वॉरियर्सचे मंगेष नाईक, तसेच राईजिंग स्टारचे सिद्धेश राठोड आणि समीर बाकाडे हे संघमालक होते.
स्पर्धेची अंतिम लढत ही विराज 11 आणि ग्लोरीअस या संघामध्ये झाली. अंतिम सामन्यामध्ये ग्लोरियस संघातून सचिन, मोहन, तेजस आणि राज यांनी प्रथम फलंदाजी करत 4 ओवरमध्ये 45 धावा केल्या.
46 धावांचा पाठलाग करताना सुयोग पोहेकर आणि अभिजीत शिंगरूत, कुणाल बिराजदार यांनी चांगली फलंदाजी करत अखरेच्या षटकात विराज 11 संघाला विजय मिळवून दिला.
या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून सचिन शिंगरूत, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सुयोग पोहेकर, मालिकावीर म्हणून अभिजीत शिंगरूत, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून शुभम रहाटे, तसेच इमर्जिंग प्लेयर म्हणून प्रथमेश लोखंडे यांची निवड करण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन नाईक काका, रवींद्र बांधणकर, प्रकाश शिंगरूत, मंगेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. प्रीमिअर लीग 2019 स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला रायगडचे उत्कृष्ट फलंदाज भूषण मोरे, आरडीसीएचे पदाधिकारी प्रशांत ओक, किरण बांधणकर, प्रभाकर म्हात्रे, चंद्रकांत भगत आदी उपस्थित होते.