Breaking News

अलिबाग येथे नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धा

अलिबाग : प्रतिनिधी

अलिबाग तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे नगराध्यक्ष चषक ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 19 ते 26  मे या कालावधीत ही स्पर्धा आर. सी. एफ. क्रीडासंकुल करूळ येथील मैदानात खेळली जाणार आहे. अलिबाग तालुक्यातील 16 संघानाच या स्पर्धेत प्रवेश देण्यात येणार आहे.

स्पर्धेतील सामन्यांसाठी गुलाबी चेंडू (पिंक बॉल) वापरण्यात येणार आहे. जर अलिबाग तालुक्यातील 16 संघ  या स्पर्धेसाठी प्रवेश घेऊ शकले नाहीत, तर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमधील आमंत्रित संघांना स्पर्धेत प्रवेश देण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्‍या अलिबाग तालुक्यातील संघांनी प्रसाद मगर 9922393835, ॠषिकेश पिंगळसकर 8850058323 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आलिबाग तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी केले आहे.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

पनवेल ः रामप्रहर वृत्तदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त …

Leave a Reply