Breaking News

बोगस मतदार नोंदणीसंदर्भात पनवेलमधील पाच शाळांना नोटीस

गटशिक्षण अधिकार्‍यांनी दिले कारवाईचे निर्देश

पनवेल ः रामप्रहर वृत्त

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक येत्या सोमवारी म्हणजेच 30 जानेवारीला होत असून या निवडणुकीच्या अनुषंगाने बोगस मतदार नोंदणीसंदर्भात पनवेल तालुक्यातील पाच शाळांना पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी एस. आर. मोहिते यांनी शनिवारी (दि. 28) नोटीस बजावून कारवाईचे

निर्देश दिले आहेत.

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस व दुबार नावे असल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्या अनुषंगाने बोगस मतदार नोंदणी करणार्‍या पनवेल तालुक्यातील पाच विद्यालयांना पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी एस. आर. मोहिते यांनी नोटीस बजावली आहे. परिपूर्ण मतदार नोंदणी अर्ज व विहित नमुन्यातील योग्य प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य, संस्थाप्रमुख यांची होती, मात्र ही जबाबदारी या पाच विद्यालयांनी योग्यरित्या पार पाडली नसल्याने त्या संदर्भातील तक्रारी कोकण विभागीय आयुक्त, तसेच रायगड जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर झाल्या होत्या. त्या अनुषंगाने निवडणुकीच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू होऊ नये यासाठी पाच शाळांना गटशिक्षण अधिकारी यांनी नोटीस बजावली असून कारवाईचे निर्देश दिले आहेत.

शिक्षकांवर कारवाई होणे हे दुर्दैवी आहे, मात्र शिक्षकांच्या नावाने बोगस मतदान होणे हे अत्यंत चुकीचे आणि लोकशाहीला हानिकारक आहे. त्यामुळे बोगस पद्धतीने कुणीही मतदान करू नये, अन्यथा बोगस मतदान करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यासंदर्भात माझे सहकारी काम करतील. -ज्ञानेश्वर म्हात्रे, महायुतीचे उमेदवार

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply