Monday , February 6 2023

भूलथापांना बळी पडू नका; सिडकोचे आवाहन

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

सिडको महामंडळाच्या महागृहनिर्माण योजना 2018-19 यशस्वी अर्जदारांना 1 जुलै 2021 पासून घरांचा (सदनिकांचा) ताबा देण्याचा निर्णय सिडकोकडून यापूर्वीच घेण्यात आला असून या संदर्भात संबंधित अर्जदारांनी कोणत्याही भूलथापांना किंवा आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे. घरांचा ताबा देण्यासाठी सिडकोने कोणत्याही मध्यस्थ संस्था, व्यक्ती किंवा प्रतिनिधीची (एजंट) नियुक्ती केलेली नाही, असे स्पष्टीकरणही सिडकोकडून देण्यात आले आहे. घरांचा ताबा देण्यासंदर्भात कोणत्याही व्यक्तिने अथवा संस्थेने कोणत्याही प्रकारचे आमिष दाखवल्यास अर्जदारांनी त्यावर विश्वास ठेवू नये, कारण याकरिता कोणत्याही मध्यस्थ संस्था, व्यक्ती किंवा प्रतिनिधीची सिडकोकडून नियुक्ती करण्यात आलेली नाही. योजना पुस्तिकेमध्ये नमूद प्रक्रियेनुसारच घरांचा ताबा देण्यात येत आहे. या संदर्भातील माहितीसाठी अर्जदारांनी केवळ सिडकोचे अधिकृत संकेतस्थळ, सिडकोचे फेसबुक, युट्यूब व ट्विटर पेज, सिडकोकडून काढण्यात येणारी प्रसिद्धीपत्रके यांवरच विश्वास ठेवावा किंवा सिडको कार्यालयाशी संपर्क साधावा. या संदर्भात मध्यस्थ किंवा प्रतिनिधी म्हणवणार्‍या कोणत्याही व्यक्ती वा संस्थेकडून अर्जदारांची फसवणूक झाल्यास सिडको जबाबदार नसेल.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply