Breaking News

आमदार महेश बालदींच्या निधीतून पारगावमध्ये रस्त्याचे काम मंजूर

पनवेल : वार्ताहर

पारगाव गावातील रस्त्याच्या कामासाठी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बदली यांच्या निधीतून दहा लाख रुपये मंजूर झाले असून या कामाचे सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांच्याहस्ते नुकतेच भूमिपूजन झाले. उरण मतदार संघात आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत. त्याअंतर्गत त्यांच्या निधीमधून पारगाव गावातील खालची आळी येथील रस्त्याच्या कामासाठी दहा लाख रुपये मंजूर झाले आहेत. या कामाचे भूमिपुजन पारगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांच्या हस्ते झाले. या विकासकामाच्या भूमिपूजनावेळी उपसरपंच सुनंदा नाईक, माजी सरपंच महेंद्र पाटील, माजी उपसरपंच मनोज दळवी, निशा पाटील, अंजली कांबळे, रत्नदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील रस्त्याच्या कामासाठी निधी दिल्याबद्दल ग्रामस्थांनी मवहेश बालदी यांचे आभार मानले आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply