उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील हायवे रोड व सर्व्हिस रोड हद्दीत अवैधरित्या रोड पार्किंग केलेल्या वाहनांवर सन 2022 मध्ये मोटर वाहन कायदा, कलम 122/177 अन्वये 11,4,21 वाहनांवर कारवाई करण्यात आलेल्या असून, त्यांच्यावर एकूण दंडाची रक्कम 1कोटी 04 लाख 29 हजार 500 एवढ्या रकमेची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच मोटर वाहन कायदा कलम 129/177 अन्वये 6581 कारवाई करण्यात आली असून त्यावरील दंडाची रक्कम 32लाख 72 हजार एवढ्या रकमेची दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. सन 2023 मध्ये मोटर वाहन कायदा कलम 122/177 अन्वये 2723 कारवाई करण्यात आलेल्या असून, त्यांच्यावर एकूण दंडाची रक्कम 31लाख 03 हजार 500 एवढ्या रकमेचे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे तसेच मोटर वाहन कायदा कलम 129/177 अन्वये 459 कारवाई करण्यात आली असून त्यावरील दंडाची रक्कम 22,लाख 9 हजार 500 एवढ्या रकमेची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गायकवाड यांनी दिली आहे. या दंडात्मक कारवाईने शासनाच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे. त्याच प्रमाणे ठिकठिकाणच्या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असून, रस्त्यावरील वाहतुक सुरळीत होण्यात मदत होत आहे. त्यामुळे उरण वाहतूक पोलिसांबाबत येथील वाहनचालक आणि दैनंदिन प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.