पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने संघटनात्मक आढावा बैठकीचे आयोजन शनिवारी (दि. 9) करण्यात आले होते. या बैठकीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षाची भूमिका मांडली. पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या संघटनात्मक आढावा बैठकीला भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार योगेश सागर, आमदार महेश बालदी, महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, ज्येष्ठ नेते नंदू पटवर्धन, भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, प्रल्हाद केणी, जितेंद्र घरत, अमरीश मोकल, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, नगरसेवक प्रकाश बिनेदार, नितीन पाटील, नगरसेविका चारुशीला घरत तसेच सी. सी. भगत, विनोद साबळे, ब्रिजेश पटेल, रवी जोशी, के. के. म्हात्रे, किर्ती नवघरे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह आमदार प्रशांत ठाकूर, आमदार योगेश सागर यांनी मार्गदर्शन केले.
शेकापच्या जि. प. सदस्य पदीबाई ठाकरे पती समर्थकांसह भाजपमध्ये
पनवेल तालुक्यात होणार्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांचे पदाधिकारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहे. अशाच प्रकारे शेतकरी कामगार पक्षाच्या वडघर जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य पदीबाई ठाकरे यांचे पती बाळाराम चाहू ठाकरे यांच्यासह अनेकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्वागत केले. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार योगेश सागर, आमदार महेश बालदी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील, भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, ज्येष्ठ नेते नंदू पटवर्धन, सुषाभ म्हात्रे, प्रकाश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.