Breaking News

ना. रवींद्र चव्हाण यांनी घेतले पालीच्या बल्लाळेश्वराचे दर्शन

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती; ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे स्वागत

पाली : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम व अन्न, नागरी पुरवठा मंत्री तथा पालघर व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी (दि. 7) सकाळी पाली येथील श्री. बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत कोकण शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजप नेते सतीश धारप, वैकुंठ पाटील, अनिरुद्ध पाटील उपस्थित होते.श्री. बल्लाळेश्वराचे दर्शन व अभिषेक झाल्यानंतर भाजप नेत्या गीता पालरेचा यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष व गीता पालरेचा यांचे वडील वसंतराव ओसवाल यांची भेट घेतली. मंत्री आ. रविंद्र चव्हाण यांचे गीता पालरेचा यांच्या निवासस्थानी स्वागत करण्यात आले. कोकण शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या. या अल्पावधीच्या दौर्‍यादरम्यान मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात तसेच संघटन कौशल्य व पक्षवाढीसाठी मार्गदर्शन व काही सूचना केल्या. यावेळी भाजप नेत्या गिता पालरेचा, दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, तालुकाध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर, अलाप मेहता, कॉन्ट्रॅक्टर प्रकाश पालरेचा त्याचप्रमाणे तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

‘दिबां’च्या स्मृतिदिनानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी (दि. …

Leave a Reply