Breaking News

महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकर्‍यांसाठी मोदी; सरकारकडून 700 कोटींची मदत जाहीर

नवी दिल्ली ः केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकर्‍यांसाठी जवळपास 700 कोटी रुपये मंजूर केले आहेत. कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना मंगळवारी (दि. 27) ही मदत जाहीर केली. राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. याचा फटका राज्यातील शेतीलाही बसला. पुराचे पाणी शेतात आल्याने प्रवाहाच्या वेगात पिकेही वाहून गेली, तर काही ठिकाणी पाणी साचून राहिल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply