मोहोपाडा : प्रतिनिधी
मोहोपाडा येथील प्रवेशद्वाराजवळील मैदानावर कै. विशाल काशिनाथ खराडे प्रीमिअर लीग ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 40 वर्षांपुढील खेळाडू आणि त्यापेक्षा कमी वय असणारे खेळाडू असे दोन गट पाडण्यात आले होते. या लीगचा अंतिम सामना शिवशक्ती 40+ मोहोपाडा आणि श्री गणेश क्रिकेट क्लब मोहोपाडा यांच्यात झाला. यात श्री गणेश संघाने बाजी मारली.
कर्णधार अक्षय तेलिंगे कर्णधार असलेल्या श्री गणेश संघाने नाणेफेक जिंकून एक षटकाच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करून 18 धावा केल्या. राकेश खराडे कर्णधार असलेला शिवशक्ती 40+ संघ धावांचे लक्ष पार करीत असताना गारद झाला. विजेत्या तसेच उपविजेत्या संघाला कै. विशाल काशिनाथ खराडे यांच्या स्मरणार्थ चॅम्पियन ट्रॉफी मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आली.
स्पर्धेत मालिकावीरचा मान ओंकार म्हात्रे याने कुलर व आकर्षक ट्रॉफीसह पटकाविला. उत्कृष्ट फलंदाज सचिन अहिर व उत्कृष्ट गोलंदाज रवी सिंग ठरला. त्यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोहोपाडा येथील आविष्कार क्रिकेट क्लब आणि श्री गणेश युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Check Also
कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा
कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …