भाजप पदाधिकार्यांची मागणी
खारघर : रामप्रहर वृत्त
खारघर शहरातील फुटपाथवरील अनाधिकृत फेरीवाले हटविण्यात यावे, अशी मागणी भाजप खारघर पदाधिकार्यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘अ’चे प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांना निवेदन दिले आहे.खारघर शहरातील जवळजवळ सर्व सेक्टरमधील फुटपाथ अडवून दिवसभर अनाधिकृत फेरीवाले, टपरीवाले व्यवसाय करीत असतात. हे आपणही पाहीलेले आहे. याबाबतच्या रहिवास्यांच्या अनेक तकारी नगरसेवकांकडे आणि आमच्या सेक्टर 13 मधील पक्ष कार्यालयात येत असतात. फुटपाथ प्रामुख्याने पादचारींच्या सुलभ व सुरक्षित रहदारीसाठी असतात. हे फुटपाथ फेरीवाल्यांनी अडविल्याने नाईलाजाने त्यांना रस्त्यावरूनच चालावे लागते. प्रसंगी अपघात ही होतात. गर्दी वाढल्याने सोनसाखळी चोरण्याचे प्रकार वाढले आहेत.
या संदर्भात 28 डिसेंबर 2021 रोजी आम्ही आपल्याला पत्र दिले होते, परंतु आजपर्यंत या संदर्भात कार्यवाही केलेली नाही. तरी येणार्या दोन दिवसांत आपण ठोस कार्यवाही केली नाही तर आम्हाला नाईलाजास्तव आपल्याला विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल. तरी परिस्थितीचे गांभीर्य ओळखन त्वरीत कार्यवाही करावी, असे भाजप खारघर पदाधिकार्यांनी दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे. भाजप खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, किर्ती नवघरे यांची सही असलेल्या या निवेदनासोबत 28 डिसेंबर 2021 रोजीचे पत्रही जोडण्यात आले आहे.
Check Also
शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …