अलिबाग : प्रतिनिधी
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड अलिबाग कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील नामांकित आस्थापनांकडील रिक्त पदांच्या भरतीसाठी गुरुवारी (दि. 16) ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
दहावी, बारावी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा, पदवी इत्यादी पात्रताधारक नोकरी करण्यास इच्छुक उमेदवारांनी www.mahaswyam.gov.in या संकेतस्थळावर job Seeker या टॅबवर जाऊन आपला User ID व Password वापरून लॉग इन करावे तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या टॅबवर क्लिक करून आपला जिल्हा निवडून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध असलेल्या पदासाठी नोंदणी करावी.
रोजगार मेळाव्यातील रिक्त पदांची माहिती वेबपोर्टलवर उपलब्ध आहे. जास्तीत जास्त बेरोजगार युवकांनी या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अमिता पवार यांनी केले आहे.
Check Also
नमो चषक स्पर्धेला लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत शानदार सुरुवात
पनवेल : रामप्रहर वृत्तशिवाजी पार्क व आझाद मैदान हे राज्याच्या दृष्टिकोनातून मुंबईतील अत्यंत महत्त्वाची अशी …