रेवदंडा : प्रतिनिधी
रेवदंडा हरेश्वर मैदानात नुकतीच चौल प्रीमिअर लीग (सीपीएल) मर्यादित षटकांची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा रंगली. या स्पर्धेत श्री दत्त चौल-भोवाळे संघाने विजेतेपद पटकाविले, तर खास बॉईज आग्राव संघ व्दितीय क्रमांकाचा मानकरी ठरला.
स्पर्धेत चौल ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या चौल, सराई, आग्राव, चुनुकोळीवाडा या परिसरातील खेळाडूंचा सहभाग होता. स्पर्धेत मालिकावीर आग्राव संघाचा शुभम, उत्कृष्ट फलदांज व अंतिम लढतीचा सामनावीर धनजंय (बबलू) गोळे, तर उत्कृष्ट गोलदांज म्हणून आकाश तवसाळकर याची निवड करण्यात आली. विजेते संघ व गुणवंत खेळाडूंना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेत पंचाचे काम विक्रम सुर्वे, राजू भोईर यांनी, समालोचन तेजस शिंदे व निशांत पाटील यांनी, तर गुणलेखन मुकादम यांनी केले.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …