Breaking News

पेट्रोलपंपावर दुचाकीने घेतला पेट

अग्निरोधक सिलिंडरने विझवली आग

खोपोली ः बातमीदार

सॅनिटायझर फवारणीत दुचाकीला आग लागल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत असतानाच शिळफाटा खोपोली येथील पेट्रोलपंपात दुचाकीने पेट घेतल्याने एकच पळापळ झाली, परंतु पंपातील कर्मचार्‍याने प्रसंगावधान राखत अग्निरोधक सिलिंडरचा मारा केल्याने आग विझली आणि मोठा अनर्थ टळला. शुक्रवारी दुपारी शिळफाटा पेट्रोलपंपात दुचाकीस्वाराने दुचाकीत पेट्रोल भरल्यानंतर दुचाकी सुरू कताना अचानक दुचाकीने पेट घेतला. पंपात पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांची यामुळे भीतीने गाळण उडाली. पेट घेतलेल्या अवस्थेतच दुचाकीस्वार आणि पंपावरील कर्मचार्‍यांनी दुचाकी ओढत पंपासमोर मोकळ्या जागेत टाकली. पाणी आणि फोमचा मारा केल्याने पाच मिनिटांत आग विझल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply