आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त
कामोठे येथील रविशेठ जोशी चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. त्यानुसार ट्रस्टतर्फे स्व. मितेश जोशी यांच्या स्मरणार्थ कामोठे येथील साई समर्थ हॉस्पिटलच्या सेवेंतर्गत मोफत महाआरोग्य व रक्तदान शिबिर मंगळवारी (दि. 25) आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत मंगळवारी झाले.
कामोठे सेक्टर 36 येथील मसाला मंत्रा येथे झालेल्या या शिबिरास भाजप कामोठे शहर अध्यक्ष रविशेठ जोशी, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अरुणकुमार भगत, सतिश पाटील, गोपीनाथ भगत, माजी नगरसेविका कुसूम म्हात्रे, अरुणा भगत, पुष्पा कुत्तरवडेे, भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष विद्या तामखेडे, महिला मोर्चा शहर अध्यक्ष वनिता पाटील, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा नेते हॅप्पी सिंग, युवा मोर्चाचे कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, भाजप नेते प्रदीप भगत, रमेश तुपे, भाऊ भगत, अशोक मोटे, जयेंद्र जोशी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
या शिबिरात जनरल तपासणी, नेत्र तपासणी व चष्मे वाटप, हाडांची तपासणी, स्त्रीरोग तपासणी, दंत तपासणी, रक्तदाब तपासणी, रक्त तपासणी, इसीजी अशा विविध तपासण्यात करण्यात आल्या. त्याचप्रमाणे अनेकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून या शिबिरास प्रतिसाद दिला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रविशेठ जोशी त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्याबाबतचे अनेक उपक्रम सातत्याने राबवून नागरिकांना दिलासा देण्याचे काम करीत आहेत. त्यांनी आज आयोजित केलेल्या रक्दान शिबिरामुळे अनेकांना जीवदान देण्याचे काम होत आहे. हे सगळ्यात पुण्याचे काम आहे. त्यांनी आपले कार्य असेच सातत्याने सुरू ठेवावे. पुढे बोलताना त्यांनी प्रत्येकाने आपापल्या परीने समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करीत योगदान देणे गरजेचे आहे, असे आवाहन केले, तर माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी, कोणत्याही प्रकारचा भेद न करता काम करणे हा रविशेठ जोशी यांचा स्वभाव असल्याचे सांगत आरोग्य शिबिर राबविल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर व माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रायगड मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी पनवेल महापालिकेचे माजी आरोग्य सभापती तथा भाजप नेते डॉ. अरुणकुमार भगत यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, या उपक्रमाचे औचित्य साधून भाजप महिला मोर्चा कामोठे शहर चिटणीसपदी सुरेखा लांडे आणि वनिता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या.