Breaking News

अधिवेशनासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हीप बजावण्याचा निर्णय

न पाळणार्‍यांवर होणार अपात्रतेची कारवाई -प्रतोद

मुंबई : प्रतिनिधी
केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता शिंदे गटाकडून पुढील पावले उचलली जात आहेत. मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी सोमवारी (दि. 20) विधिमंडळात पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती.
या बैठकीत आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत चर्चा झाली तसेच अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या सर्व 56 आमदारांना व्हीप बजावण्याचा निर्णय झाला. या संदर्भात माहिती देताना प्रतोद भरत गोगावले म्हणाले की, आगामी काळातील होणार्‍या अधिवेशनास शिवसेनेच्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्यासंदर्भात व्हीप काढला जाणार आहे. हा व्हीप ठाकरे गटातील आमदारांनादेखील लागू असेल. त्यांनी व्हीप स्वीकारला नाही, तर त्यांच्यावर नियमांनुसार चर्चा करून कारवाई केली जाईल. निलंबन लगेच केले जाईल की नाही हे आता सांगता येणार नाही, पण अशा प्रकारची कारवाई विचाराधीन राहील.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply